विशाळगड किल्ल्याचे फोटो

बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याच्या ऐतिहासिक घटनांची आठवण करून देणारे ठिकाण. पावसाळ्यात नितांत सुंदर निसर्ग अनुभवायला मिळतो. कोल्हापूर ते मलकापूर रस्त्याने पांढरपाणी गांव ६० कि.मी. अंतरावर आहे. पांढरपाण्याहून विशाळगड १८ कि.मी. आहे. विशाळगडच्या अलिकडे १४ कि.मी. अंतरावर पावनखिंड आहे. गावातून २ कि.मी. दुर्गम जागी पावनखिंडीचा निसर्गरम्य परिसर आहे. गडाच्या माथ्यावर अर्धचंद्र तळं, भूपाळ तळं, शिवमंदिर, वाघजाई मंदिर, नरसोबाचं देवालय, मारुती मंदिर अशी मंदिरे आहेत. पाताळलोक दरीच्या परिसरातून पावसाळ्यात पडणार्‍या धबधब्यांचं दृष्य मोठं विहंगम दिसतं. कोकणांतल्या दिशेने घुसलेले उत्तुंग कडे व घनदाट अरण्य आपल्याला जागेवर खिळवून ठेवते.

[nggallery id=12]

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *