शाही मशरूम

साहित्य:

 • २५० ग्रॅम मशरुम
 • १ वाटी हिरव्या वाटाण्याचे दाणे
 • १०० ग्रॅम पनीर
 • ४ कांदे
 • ३ टोमॅटो
 • १ लहान आल्याचा तुकडा
 • कोथिंबीर
 • १ लहान चमचा जीरे
 • १ लहान चमचा लाल तिखट
 • १/४ लहान चमचा हळद
 • १/४ लहान चमचा गरम मसाला
 • १ कप क्रीम
 • १ लहान चमचा मीठ
 • २ मोठे चमचे तूप
 • १/२ कप काजू पावडर
 • १/२ कप मावा
 • ८-१० बदाम

कृती:

शाही मशरूम

शाही मशरूम

मशरुम गोल चिरुन घ्या. पनीर लहान चौकोनी चिरा. कांदा व आलं मिक्सरमधून काढा. टोमॅटो वेगळे मिक्सर मधून काढा. कोथिंबीर चिरुन घ्या. बदाम बारीक चिरा.

एका कढईत तूप गरम करा. जीरे टाकून कांदा परता, लालसर झाल्यावर आल्याची पेस्ट टाका. २ मिनीटे परता आता परतून मिक्समधून काढलेला टॉमेटो टाका.

ग्रेव्ही तूप सोडायला लागल्यावर काजू पावडर व मावा टाका. हळद लाल तिखट, गरम मसाला व मीठ टाकून परता. आता पनीर, मशरुम व वाटाणे टाकून १ वाटी पाणी टाका. कमी गॅसवर झाकून शिजवा. भाज्या शिजल्यावर क्रीम टाका.

ग्रेव्ही शिजल्यावर गॅस बंद करा. वाढताना बदाम व कोथिंबीर टाकून वाढा.