शासन व कुटुंब

कुटुंबाकुटुंबातील व्यक्तीच शासन चालवीत असतात. त्यामुळे शासनाच्या धोरणात समाजाचे, समाज घडविणाऱ्या कुटुंबाचे प्रतिबिंब दिसते. तरीही दोघांचे अधिकारक्षेत्र मात्र वेगवेगळे आहे. कुटुंबाच्या कक्षेबाहेरील, क्षमतेबाहेरील गोष्टींचे नियमन शासन करू शकते. उदा. व्यापार, संरक्षण, दळणवणाच्या सोयी वगैरे, त्यासाठी शासन कायदे करते. कायदा मोडणाऱ्यास शिक्षाही देऊ शकते, पण कायद्याने पालन करण्याची मानसिकता भीतीपोटी नव्हे, तर मनापासून, शासन निर्माण करून शकत नाही. ती कुटुंबात निर्माण व्हावी लागते.