शेतकरी आणि उंदीर

एक शेतकरी फार विनोदी होता. एके दिवशी दुर्दैवाने, त्याच्या घरास आग लागली असता, घरातला एक उंदीर आपला जीव वांचविण्यासाठी धडपडत बाहेर आला आणि आता पळून जाणार, तोच त्या शेतकऱ्याने त्यास पकडून पुनः आगीत टाकले व म्हणाला, ‘अरे, ज्याने तुला आजपर्यंत खाऊ घालून तुझे पोषण केले, त्या तुझ्या मित्रावर हा असा वाईट प्रसंग आला असता, या वेळी तू त्यास सोडून जाऊ पाहतोस, या तुझ्या कृतघ्नपणास काय म्हणावे ?’

तात्पर्य:- स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मनुष्य सगळ्या पुण्याईवर आणि सद्रुणावर पाणी सोडण्यास तयार होईल.