शिंगाडा शंकरपाळे

साहित्य :

  • एक वाटी शिंगाडा पीठ
  • अर्धी वाटी राजगिरा पीठ
  • पाव वाटी साखर
  • पाव वाटी दूध
  • पाव वाटी तूप
  • वेलची पूड चिमुटभर
  • चवीपुरते मीठ
  • तूप

कृती :

एका ताटात पाव वाटी तूप घेऊन चांगले फेसाटून घ्या. त्यात दोन्ही पिठे व मीठ एकत्र चाळा. त्यात वेलची पूड टाका. दुधात साखर टाकून गरम करा. दुधात साखर पूर्णपणे घ्या. हे दुध पिठात घालून पीठ घट्ट मळून घ्या. हा गोळा तासभर झाकून ठेवा. नंतर या पिठाच्या नेहमी आपण करतो त्याप्रमाणे शंकरापाळे करा. कढईत तूप गरम करून खमंग तळून काढा.