शिंगाड्याच्या पिठाचे लाडू

साहित्य :

  • १ मोठी वाटी शिंगाड्याचे पीठ
  • पाव वाटी तूप
  • पाऊण वाटी पिठीसाखर
  • २ वेलदोड्याची पूड.

कृती :

पातेल्यात तूप घालून गरम झाले की त्यात पीठ घालून चांगले खमंग भाजा.नंतर त्यात पिठीसाखर व वेलदोड्याची पूड घाला. वरून १ चमचा साजूक तूप घाला. चांगले कालवा व लाडू वळा.