शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे निधन

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास निधन झाले.

त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी याबाबतची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होते, परंतु मी व्यवस्थित आहे, अफवा पसरवू नका असे खुद्द बाळासाहेबांनी जाहीर केल्यानंतर तमाम शिवसैनिकांच्या जीवात जीव आला होता.

परंतु मंगळवारपासून पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना वरचेवर ऑक्सिजन द्यावा लागत होता.

मंगळवारपासून त्यांनी अन्नदेखील घेतले नसल्याची चर्चा होती. या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम विराम मिळाला असून बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका पर्वाचा अस्त झाला आहे.

1 thought on “शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे निधन

  1. Pingback: १७ नोव्हेंबर दिनविशेष | November 17

Comments are closed.