श्रावण महिना

श्रावण महिना

चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे चार महिने. या दिवसात पचन शक्ति कमी होते, तसेच आरोग्य बिघडण्याचा जास्त शक्यता असते,आजार बळावतात म्हणुन या काळात आहारविहारावर जास्त नियंत्रण हवे म्हणून चातुर्मासात जास्त व्रतवैकल्ये सांगितली गेली आहेत.

तसेच पावसाळ्यात निसर्ग बहरतो, सगळीकडे हिरवाई पसरलेली असते. वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याने वटपुजा, मंगळागौरी, हरतालिका, हे सण या काळात योजिले गेले आहेत. वृक्षपुजेबरोबरच प्राणीपुजा ही आपल्या संस्कृतीत योजिली आहे. म्हणूनच नागपंचमी, बैलपोळा साजरा करण्याची प्रथा आहे.

दुसरा एक समज असा आहे, हिंदु पंचागांनुसार देवशायनी एकादाशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास असतो. आषाढी ते कार्तिकी या काळात देव निद्राधीन असतात असा समज आहे. म्हणुनच या काळात जास्तीत जास्त व्रत वैकल्ये करुन मनुष्य प्राणी सदाचरणी होऊन देवाचे कृपा छत्र आपल्यावर रहावे म्हणून प्रयत्न करतो. श्रावण महिना चातुर्मासात श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो. म्हणुनच या महिन्यात सण व्रतवैकल्ये जास्त असतात. श्रावणी सोमवार, प्रदोष याच महिन्यात असतात.