श्रीगुरूची आरती

श्रीगुरूची आरती

देहत्रय निरसीत चिन्मय जें उरलें ॥
तें मी ऐसें तुझिया वचनें जाणवलें ॥
पांचांच्या अन्वयें अवघें समरसलें ॥
ज्ञानादि त्रिपुटीचें भानहि मावळले ॥ १ ॥

जय देव जय देव सद्ग्रुरुनाथा ॥
तव पददर्शनमात्रें हरली भवव्यथा ॥ ध्रु० ॥

आहे नाहीं पण याविरहित मी साचा ॥
माझ्या ठायीं व्यापक स्थितिलय विश्वाचा ॥
तेथें भेदाभेद मायिक तो कैंचा ॥
घडला अनुभव ऐसा प्रकार स्वामीचा ॥ जय० ॥ १ ॥

जें कांहीं बोलणें जललहरिप्राय ॥
त्याहुनि वर भिन्नत्वें काय ॥
आतां मौन्यें तूझे वंदावे पाय ॥
गोसावीनंदन सहजचि चिन्मय ॥ जय० ॥ २ ॥