श्रीगुरुनाथाची आरती

सगुण हेआरती निर्गुण ओंवाळूं ॥
कल्पनेचें घृत घालू दीप पाजळूं ॥ १ ॥
ओंवाळूं आरती सद्गुरुनाथा, श्रीगुरुनाथा ॥
भावें चरणकमळावरी ठेविला माथा ॥ ध्रु० ॥
अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं ॥
आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडूं ॥ ओवाळूं ॥ २ ॥
सद्गुरूचें पूजनकेलें षोडशोपचारीं ॥
रामानंद जीवनमुक्त झाला संसारीं ॥ ओंवाळूं आरती० ॥ ३ ॥