श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुणेकरांचे अढळ श्रध्दास्थान आहे.

या गणपतीच्या दर्शानासाठी दुरवरुन भक्तगण येतात. मनोकामाना पुर्ण करणाऱ्या गणपतींध्ये या गणपतीचे नाव अग्रकमाने घेतले जाते.

भव्य दिव्य आरास हे गणपतीचे वैशिष्टय. १८९३ मध्ये श्रीमंत दगडू शेठ हलवाई यांनी ही मुर्ती बसवली.

तमाम पुणेकरांबरोबरच देश विदेशातल्या गणेश भक्तांचे हा गणपती श्रध्दास्थान आहे.

म्हणूनच वर्षभर भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून बुधवार पेठेत गणपती भवन बांधण्यात आलं आहे.

नावाप्रमाणेच हा हा गणपती श्रीमंत आहे. यंदा या मंडळाने जयपूरच्या हवामहल ची प्रतिकृती साकारली आहे. हवामहल आणि त्यावरची विदयूत रोषणाई डोळे दिपवणारी आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे फोटो