श्वासही कायमचा बंद

एका डॉक्टरांनी आपल्या रोग्याला विचारले , ” अलबतराव, मी काल दिलेल्या औषधामुळं तुमच्या उलट्या बंद झाल्या ना ?”

अलबतराव म्हणाले, ” हो, उलट्या पार बंद झाल्या, पण अजून मला श्वास मात्र अधुनमधून लागतोय.”

यावर डॉक्टर अगदी आत्मविश्वासाने त्यांना म्हणाले, ” अलबतराव, त्याची बिलकूल काळजी करू नका तुम्ही. माझ्या आजच्या औषधाने तुमचा श्वासही कायमचा बंद होईल.”