सिंह, गाढव आणि कोंबडा

कोंबडयाच्या शब्दास सिंह फार भितो अशी प्रसिद्धि आहे. एकदा एके ठिकाणी एक गाढव आणि एक कोंबडा चरत असता, तेथे एक सिंह आला. त्यास पाहताच कोंबडयाने मोठा शब्द केला, तो ऐकून सिंह भीतीने पळत सुटला. गाढवास वाटले की, सिंह आपणास भिऊन पळतो आहे. मग तो मोठया बढाईने सिंहाचा पाठलाग करीत चालला. कोंबडयाचा शब्द ऐकू येत नाही, इतक्या अंतरावर ते गेल्यावर, सिंह मागे वळला व आपल्या पंजाच्या एकाच तडाक्याने गाढवास त्याने ठार मारून टाकले !

तात्पर्य:- एकादया थोर पुरूषास काही कारणाने भय उत्पन्न झाले असतां, तो आपणासच भीत आहे अशा समजुतीने जे मुर्ख लोक त्याला त्रास देऊ लागतात, त्यांचा परिणाम वरील गोष्टीतील गाढवासारखा होतो.