सीताफळाचे आईस्क्रीम

साहित्य :

  • २ लिटर दूध
  • ४-५ सीताफळे
  • पाऊण कप साखर
  • ६ वेलदोडे(पूड)

कृती :

सीताफळाचे आईस्क्रीम

सीताफळाचे आईस्क्रीम

दूध निम्मे होईपर्यंत आटवावे. साखर घालून आणखी पांच मिनिटे चुलीवर ठेवावे. गार होऊ द्यावे.

सीताफळाचा गर काढून ब्लेंडरमध्ये घालावा. त्यात आटवलेले दूध घालावे आणि छान मिसळून ओल्या भांड्यात मिश्रण ओतावे.

फ्रिजमधे बर्फाच्या कप्प्यात ठेवावे. अर्धवट घट्ट झाले की बाहेर काढावे. जेवणाच्या काट्याने मिश्रण ढवळावे. वेलचीपूड घालावी व ढवळून पुन्हा बर्फाच्या कप्प्यात ठेवावे.

अल्युमिनियमच्या ट्रेमध्ये किंवा कांचेच्या भांड्यात सेट होण्यास सोईस्कर पडते.