सोपा दहीवडा

साहित्य :

  • १ वाटी उडदाची डाळ
  • १ वाटी मोडाचे मूग
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • ४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ इंच आले
  • १ चमचा मीठ
  • ४-५ चमचे तेल
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जिरे
  • पाव चमचा हिंग
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • १ चमचा जिरेपूड
  • अर्धा चमचा साखर
  • २ वाट्या गोड ताक
  • पाव चमचा बेकिंग सोडा.

कृती :

सोपा दहीवडा

सोपा दहीवडा

डाळ दोन तास भिजवावी. मोड आलेले मूग, डाळ, मिरच्या व कोथिंबीर धुवून निथळावी.

आले बारीक चिरावे. सर्व एकत्र भरडसर वाटावे. पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटताना जास्ती पाणी घालू नये. मिश्रणात मीठ व सोडा घालून हाताने फेसावे. त्याचे छोटे चपटे वडे हाताने वळावे.

कुकरमध्ये मोदक वाफवतो तसे चाळणीवर फडके किंवा केळीचे पान ठेवून त्यावर तेलाचा हात फिरवावा व हे वडे वाफवून शिजवावेत. ताकात एक वाटी पाणी घालावे. वडे शिजल्यानंतर बाहेर काढावे. थंड झाले की ताकात थोडा वेळ ठेवावेत.

एकीकडे दही घुसळावे. त्यात मीठ व साखर घालावी. तेल तापवून मोहरी, जिरे व हिंगाची फोडणी या दह्यावर ओतावी. ताकातले वडे दुसर्‍या भांड्यात काढावेत. त्यावर हे दही घालावे.

सजावटीसाठी थोडी कोथिंबीर, लाल तिखट व जिरेपूड भुरभुरावी.