स्टार माझा

स्टार माझा मराठी वृत्त वाहिनीचे अधिकृत संकेतस्थळ

स्टार माझा मराठी वृत्त वाहिनीचे अधिकृत संकेतस्थळ

स्टार माझा Star Majha

२४ तास फ्री-टू-एअर (मोफत) मराठी बातम्यांची दूरचित्रवाहिनी. सुरुवात: २२ जून २००७.मराठीतील २४ तासांची राष्ट्रीय वृत्त वाहिनी ‘स्टार माझा’ अशा तीन वाहिन्यांचे प्रक्षेपण एमसीसीएस करते.

देशातील दोन मोठे मीडिया ब्रँड्स एकत्र आले आणि स्टार न्यूजच्या प्रक्षेपणासाठी त्यांनी ३१ मार्च २००३ रोजी मीडिया कन्टेन्ट अँन्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) ची स्थापना केली. एमसीसीएस हे एबीपी प्रा. लिमिटेडची १०० टक्के उपकंपनी असलेली एबीपी टीव्ही आणि स्टार ग्रुपच्या संपूर्ण मालकीची स्टार न्यूज ब्रॉडकास्टिंग लिमिटेड यांचे ७४:२६ असे जॉईन्ट व्हेंचर आहे. भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित वृ्त्तसमूहांमध्ये आनंद बझार पत्रिका ग्रुपची गणना होते.

पूर्व भारतामध्ये या समूहाची अनेक प्रकाशने आहेत, आनंद बझार पत्रिका हे बंगाली भाषेतील सर्वाधिक खपाचे दैनिक आणि द टेलिग्राफ हे पूर्व भारतात सर्वाधिक खपणारे इंग्रजी दैनिक याच समूहाच्या मालकीचे आहे. द स्टार ग्रुप हा अशियातील अग्रगण्य मीडिया ग्रुप असून भारतीय मार्केटमध्ये त्यांनी भक्कमपणे आपले पाय रोवले आहेत. अशियामध्ये स्टारच्या पन्नास वाहिन्यांचे ९ भाषांतून प्रक्षेपण होते, ज्यामुळे ५३ देशातील सुमारे ३०० दशलक्ष प्रेक्षकांची मने रिझविली जातात.Studio Picture

अशियामध्ये स्टारच्या पन्नास वाहिन्यांचे ९ भाषांतून प्रक्षेपण होते, ज्यामुळे ५३ देशातील सुमारे ३०० दशलक्ष प्रेक्षकांची मने रिझविली जातात. भारतामध्ये विविध स्वरुपाच्या ११ चँनेल्सचे प्रक्षेपण स्टार करतो.

देशातील पहिली वृत्तवाहिनी स्टार न्यूज, बंगाली भाषेतील पहिली २४ तासांची राष्ट्रीय वृत्तवाहिनी स्टार आनंद, आणि स्टार न्यूज हे हिंदी भाषेतील देशातील वृत्तवाहिनी आहे.

जून २००५ मध्ये एमसीसीएसने स्टार आनंदा सुरू केले आणि पहिलेपणाची मूहूर्तमेढ रोबण्याच्या परंपरेत आणखी एकाची भर पडली. प्रक्षेपणाच्या पहिल्या दिवसापासूनच स्टार आनंदाने बंगालमध्ये एक नवा इतिहास रचला. बंगालमधील त्याच परंपरेची आता स्टार माझा महाराष्ट्रात पुनरावृत्ती करत आहे.

स्टार माझा मराठी वृत्त वाहिनीचे अधिकृत संकेतस्थळः www.starmajha.com