स्ट्रॉबेरी सरबत

साहित्य :

  • १ किलो साखर
  • ४०० मिली.पाणी
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • पाव चमचा रासबेरी रेड कलर
  • अर्धा चमचा स्ट्रॉबेरी इसेंस

कृती :

प्रथम १ किलो साखरच ४०० मिली. पाणी घालावे. त्यात अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे. एकत्र करून ढवळावे व गॅसवर १ उकळी येईपर्यंत ढवळत राहावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करून व ते लिक्विड गार झाल्यावर त्यात इसेंस व कलर घालावा. सरबत देण्याचे वेळी पाव भाग तयार केलेले लिक्विड त्यात पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे.