सुकविलेली शिंपल्यातील माष्टे

साहित्य:

  • शिंपल्या
  • मीठ

कृती:

शिंपल्या स्वच्छ धुवून एका भांडय़ात घेऊन अगदी थोडे पाणी घालावे. (शिंपल्यांना नंतर पाणी सुटते) शिंपल्यांचे तोंड उघडेपर्यंत उकडून घ्याव्या. थंड झाल्यावर सगळ्या शिंपल्यातील माष्टे काढून एका मोठय़ा ताटात किंवा प्लास्टिकवर ठेवावीत व थोडेसे मीठ लावून कडकडीत उन्हात खडखडीत होईपर्यंत वाळवावीत व डब्यात भरून ठेवावी. पावसाळ्यात मासे मिळत नाहीत तेव्हा ती वापरता येतात. नुसते भाजूनही खायला छान लागतात.