सुंदर आमटी

सुंदर आमटी

सुंदर आमटी

साहित्य :

  • १/२ किलो टोमॅटो मोठे
  • ३/४ बटाटे उकडून
  • नारळाची १ वाटी
  • २ कांदे बारीक चिरुन
  • मीठ
  • तिखट
  • साखर

कृती :

टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी कराव्यात. बटाटे उकडून, साले काढून मोठ्या फोडी कराव्यात. थोड्या बटाट्यांच्या फोडी पाण्यात कुसकरून ठेवाव्यात, म्हणजे आमटी दाट होतो. ओले खोबरे थोडेसे वगळून ठेवावे व बाकीच्या नारळाचे दूध काढून तयार ठेवावे.

तुपावर मोहरी टाकून कांदा परतून घ्यावा. त्यात टोमॅटोच्या फोडी टाकून थोडे पाणी घालावे. जरा दोनचार उकळ्या आल्या, की बटाट्यांच्या फोडी, पाण्यात कुसकरलेले बटाटे व नारळाचे दूध घालावे. नंतर त्यात तिखट, मीठ व साखर घालावी. ओले खोबरे घालावे. रस जरा जास्तच असला पाहिजे. आमटी फार सुंदर होते. (हळद व गुळ घालू नये)