स्वत: डुक्कर बनून बसला

सर मोझेस मॉन्टेफ़र हा ज्यू गृहस्थ इंग्लडमध्ये राहात होता. एकदा तो मेजवाणीला गेला असता, त्याच्या शेजारी बसलेला एक ज्यूद्वेष्टा गृहस्थ कुत्सितपणे त्याला म्हणाला, मी नुकताच जपानमध्ये जाऊन आलो. खरोखरच मोटआ स्वच्छ व सुंदर देश आहे तो. तिथे एकही डुक्कर किंवा ज्यू पाहायला मिळत नाही.
यावर मॉन्टेफ़र हसत हसत त्याला म्ह्नाला, मग आपण दोघेही त्या देसत रहायला जाऊ या, म्हणजे जपानी लोकांना, डुक्कर व ज्यू या दोघांचाही एकेक नमुना पाहायला मिळेल.

मॉन्टेफ़रच्या या धारदार उत्तरानं घायाळ झालेला तो ज्यूद्वेष्ठा गृहस्थ तिथून उठला व चरफ़डत दुसऱ्या टेबलावर जाऊन बसला ! दुसऱ्यावर नाहक फ़ेकलेलं शस्त्र हे कधीतरी स्वत:वर उलटतं, ते असं.