सैंपाकी आणि मासा

एका मुसलमानाच्या घरचा एक सैंपाकी, एके दिवशी जिवंत माशास तेलात तळीत असता, त्या उष्णतेने त्या माशास इतके दुःख झाले की, ते टाळण्यासाठी त्याने चुलीत उडी टाकली ! पण त्यामुळे त्याची अशी स्थिती झाली की, त्यापेक्षा पूर्वीची स्थिती बरी होती, असे त्यास वाटल्याशिवाय राहिले नाही.

तात्पर्य:- केव्हा केव्हा एखादे औषध प्रकृतीस इतके अपायकारक होते की, त्यापेक्षा मूळचा रोग चांगला असे म्हणण्याची पाळी येते.