स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच

साहित्य :

 • २२५ ग्रॅम मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न)
 • हिरव्या मिरच्या
 • १ टी स्पू. लिंबाचा रस
 • १/२ वाटी खवलेले नारळ
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • चवीपुरती साखर
 • हळद
 • मीठ
 • फोडणीसाठी तेल
 • कडीपत्त्याची पाने
 • मोहरी
 • जीरे
 • हिंग
 • बटर किंवा तूप
 • ब्रेड

कृती :

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच

मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न), हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून भरडुन घ्या. गॅसवर भांडे ठेवून त्यात थोडं तेल टाकून त्यात जीरे-मोहरी, चिरलेल्या हि. मिरच्या, कढीपत्त्याची पाने, हिंग टाका. नंतर त्यात भरडलेलं मिश्रण टाकून चांगले हलवून घ्या. भांड्यावर झाकण ठेवून ३-४ मिनीटे ठेवा. डिशमध्ये काढून कोथिंबीर व खवलेले नारळ पेरा. मक्याचा चवदार उपमा तयार..!

हा तयार उपमा २ ब्रेड स्लाईसेसच्या मध्ये भरुन बटर किंवा तूप लावून टोस्टरमध्ये भाजुन घ्या व गरमागरम सॉस किंवा चटणीसोबत खायला द्या. हे तयार आहे तुमचे स्वीट कॉर्न सॅंडविच.

One thought on “स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच

 1. शेफ शाहिद-अख्तर

  बनवायला अगदी सोप्पे,लहान मुलांपासून वृद्धाना जीवनसत्वाने परिपूर्ण आणि खायला रुचकर….छान पदार्थ..!

Comments are closed.