Tag Archives: अंगारकी

अंगारकी चतुर्थी

अंगारकी चतुर्थी

अंगारकी चतुर्थी

भारतीय कालगणनेनुसार कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे चौथी तिथी मंगळवारी आली तर त्या तिथीला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.

या दिवशी उपास केला असता, तसेच गणपती देवाची स्तुती केली असता विशेष प्रसन्नता वाटते, असे मानले जाते.

मुदगल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव “अंगारक” हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. याचे पालन भूमातेने केले म्हणून त्याला ‘ भूमीपुत्र ‘ किंवा ‘ भौम ‘ असेही संबोधन आहे.