Tag Archives: अक्कलकोट

श्रीअक्कलकोटस्वामींची आरती

 

श्रीअक्कलकोटस्वामींची आरती

जयदेव जयदेव जय श्रीस्वामीसमर्था ।
आरती ओंवाळूं चरणीं ठेवुनियां माथा ॥ ध्रु० ॥

छेली-खेडेग्रामीं तूं अवतरलासी ।
जगदुद्धारासाठीं राया तुं फिरसी ॥
भक्तवत्सल खरा तूं एक होसी ।
म्हणूनि शरण आलों तूझे चरणांसी ॥ जय० ॥ १ ॥

त्रैगुण परब्रह्म तूझा अवतार ।
त्याची काय वर्णूं लीला पामर ॥
शेषादिक शिणले, नलगे त्यां पार ।
तेथें जडमूढ कैसा करुं मी विस्तार ॥ जय० ॥ २ ॥

देवाधिदेवा तुं स्वामीराया ।
निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां ॥
तुजसी अर्पण केली आपुली ही काया ।
शरणागता तारीं तूं स्वामीराया ॥ जय० ॥ ३ ॥

अघटित लीला करुनी जडमूढ उद्धरिले ।
कीर्ति ऐकुनि कानीं चरणीं मी लोळे ॥
चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें ।
तुझ्या सूता नलगे चरणवेगळें ॥ जय० ॥ ४ ॥