Tag Archives: अक्षर उपक्रम

महिंद्रा कॉलेजचा अक्षर उपक्रम

महिंद्रा कॉलेजचा अक्षर उपक्रम

महिंद्रा कॉलेजचा अक्षर उपक्रम

यूडब्ल्यूसी महिंद्रा कॉलेजच्या वतीने राबवण्यात येणारा अक्षर हा उपक्रम खरोखरीच वाखण्याजोगा आहे. पुण्यापासून ४० किलो मीटर अतंरावरील मुळशी तालुक्यात असणारे यूडब्ल्यूसी महिंद्रा महाविद्यालयात विविध देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या महाविद्यालयाला १५ वर्ष पुर्ण झाल्यानिम्मत नुकत्याच एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या १५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. या १५ वर्षांच्या कालवधीत कॉलेजची जितकी प्रगती झाली तितकीच प्रगती झाली महाविद्यालयाच्या आजुबाजूच्या ग्रामीण भागाचाही. सामाजिक जाणिवेतून निर्माण करण्यात आलेल्या अक्षर या संकल्पनेमूळे या भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांना दिर्घकालीन शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन दिले जाते. तसंच पालकांना मुलांच्या शिक्षणाला महत्व पटवून देऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचं काम या उपक्रमाखाली केलं जातं. या उपक्रमाचं फलित म्हणजे स्थानिकांध्ये निर्माण झालेला सकारत्मक बदल. तसंच सामाजिक बांधिलीकी ही इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्तवाचा पैलू आहे.

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

विविध देश आणि संस्कॄतीमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर महाविद्यालयाने सामाजिक भान जपत आपलं शिक्षणाचं कार्य चालू ठेवलं. २००५ साली सुरू केल्या गेलेल्या या उपक्रमात माहाविद्यालयाच्या आजुबाजूची गावं, शाळा तसेच स्वयंसेवी संस्था ही सहभागी झाल्या आहेत. अक्षर मधील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इंग्लिश, मराठी या विषयांवर मार्गदर्शन केलं जातं. तसेच महाविद्यालयाच्या वतीने वर्ग, प्रयोगशाळा, खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिलं जातं. आज अक्षर या उपक्रमात शभरांहून अधिक मूले आहेत. अक्षर मूळे सकारत्मक बदल घडून आले. आहेत, अक्षर सारखे उपक्रम सर्वच महाविद्यालयांनी राबवले पाहिजेत असं मत महिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी माहाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केलं.