Tag Archives: अखिल भरतीय नाट्य परिषद

आळेकर आणि सुहास जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार

यंदाचा अखिल भरतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर आणि अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे विविध पुरस्कारांसाठी अन्य ५४ मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.

१७ जून रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात आळेकर आणि जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतिचिन्ह, २५ हजार रुपये, शाल आणि श्रीफळ, असे आहे.

दर वर्षी अखिल भरतीय नाट्य परिषदेतर्फे नाटककार गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनाप्रीत्यर्थी हे पुरस्कार प्रदान केले जातात.
१४ जून रोजी यशवंत नाट्य मंदिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबिर होणार आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे, नाटककार सतीश आळेकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, प्रदीप मुळ्ये आणि राजन भिसे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.