Tag Archives: अख्खी उडीद

चविष्ट डाळ आणि कढी

साहित्य:

  • २५० ग्रॅम अख्खी उडीद
  • १ तुकडा आले
  • १०० ग्रॅम तूप
  • १०० ग्रॅम टॉमेटो
  • २-४ हिरव्या मिरच्या
  • चवीप्रमाणे मीठ
  • १/२ लहान चमचा हळद
  • १/२ लहान चमचा लाल तिखट

कृती:

चविष्ट डाळ आणि कढी

चविष्ट डाळ आणि कढी

उडीद चाळून धुऊन घ्या. पातेल्यात उडद व पाणी टाकून शिजवायला गॅसवर ठेवा.

आले-हिरवी मिरची व टॉमेटो बारीक चिरून टाका. मीठ टाकून पातेले झाका. गॅस मोठा ठेवा व पाणी उडीद शिजेल एवढेच टाका.

उडीद शिजल्यावर गॅस बंद करा. कढईत तूप टाकून फोडणी टाका. अख्खी लाल सुकलेली मिर्ची व सर्व मसाले टाका व फोडणी शिजलेल्या उडद मध्ये टाका.

तयार वाढताना लिंबू व कोथींबीर टाकून वाढा.