Tag Archives: अगस्ती

अगस्तीचे सांडगे

साहित्य:

  • अगस्तीचे फुल
  • दही
  • धणे
  • जिरेपुड
  • मीठ

कृती:

अगस्तीच्या फुलांची आपण भाजी किंवा भजी करतो, तेव्हा वरील देठ आणि आतील दांडा टाकून देतो, त्याऐवजी त्याचे सांडगे करावेत. आंबट दही घेऊन त्यात धणे, जिरेपूड आणि मीठ घालावे. त्यात वरील देठं बुडवून वाळवावी. दोन दिवसांनी वाळलेली देठे पुन्हा वरीलप्रमाणे दह्यात बुडवून वाळवा. दोन पुटे दिल्यानंतर दोन-तीन दिवस कडक उन्हांत वाळवावी.

खिचडीसोबत तळून खावी