Tag Archives: अडाणी

लिहिता वाचता येत नाही

एक अडाणी माणूस पेन्सिलिनं कागदावर नुसत्याच रेघोट्या ओढत असल्याचे पाहून एका गृहस्थानं त्याला विचारलं, “काय रे! हे काय करतोस?”
अडाणी मनुष्य : गावी राहणाऱ्या मोठ्या भावाला मी पत्र लिहितोय.
दुसरा गृहस्थ : पण तू तर कागदावर नुसत्या रेघोट्या ओढतो आहेस. त्या तुझ्या भावाला कशा वाचता येणार? तुला लिहिता येत नाही का?
अडाणी मनुष्य : मला तर लिहिता वाचता येत नाहीच, पण माझ्या भावाला तरी कुठं लिहिता वाचता येतंय?