Tag Archives: अनारसे

उपवासाचे अनारसे

साहित्य :

  • जरुरीप्रमाणे वरई तांदूळ
  • साखर किंवा गूळ
  • खसखस
  • तूप

कृती :

उपवासाचे अनारसे

उपवासाचे अनारसे

वरई तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत. मग उपसून स्वच्छ कपड्यावर अर्धवट वाळवावे.

नंतर खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्यावेत. यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे. झाकून ठेवावे.

नंतर दुसरे दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. त्यावर खसखस लावावी. लालासर रंगावर तळून घ्यावेत.

सुंदर दिसतात आणि लागतातही चविष्ट.