Tag Archives: अमृतपान

स्तन सौंदर्य व कॅन्सर

स्तन हा सौंदर्याचा मानबिंदू स्तनपान हे बाळाचं अमृतपान प्रत्येक स्त्रीनं यासाठीच आपल्या स्तनांची योग्य ती काळजी घ्यायला हवी.अनादीकालापासुन वक्षस्थळे ही स्त्रीच्या सौंदर्याची केंद्रबिंदू मानली आहेत. स्त्रीच्या व्यक्यीमत्वाला उठाव देणाऱ्या खजुराहो, कोनारक इत्यादी ठिकाणी निर्भीडपणे कोरून ठेवलेल्या प्रतिमा पाहिल्या, तर भारतीय संस्कृतीमधे निसर्गसुलभ कल्पनांना योग्य ते महत्त्व देण्याच्या मनोवृत्तीचे कौतुकच करावेसे वाटते आणि आजकालच्या अश्लीलतेच्या दांभिक कल्पनांची कीव करावीशी वाटते.

माणूस हा एक सस्तन प्राणी आहे. चतु:ष्पादाची शरीर जमिनीस समांतर राहाते त्यामुळे आपोआपच स्तंनाची ठेवण शरीरापासून पुढे उभारस्थितीत राहते. मात्र दोन पायांवर उभे राहाण्याच्या, मनुष्यप्राण्याच्या संक्रमणामुळे जी अनेक स्थित्यंतरे झाली त्यात स्तनांचे नैसर्गिक उभार स्वरूप जाऊन ती ओघळती झाली आणि त्यांना कृत्रिम आधार देण्याची गरज निर्माण झाली.

स्तनांची नैसर्गिक वाढ व स्थित्यंतरे
जन्मतेवेळी स्त्री-पुरुषामध्ये स्तनाची रचना अगदी सारखी असते. केव्हा केव्हा मातेच्या नलिकाविरहीत ग्रंथीचे अंत:स्त्रावर नवजात अर्भकांच्या शरीरात जाऊन त्यांच्या स्तनामध्ये गाठ उदभवू शकते. पण बरेच वेळा ती आपोआप बरी होऊन जाते व त्याची काही विशेष काळजी करण्यासाठी गरज राहत नाही. साधारणपणे ५-६ वर्षापासुन प्रथम स्तनांच्या ग्रंथींमधे वाढ व्हायला सुरूवात होते. ही वाढ व्हायला सुरुवात होते. ही वाढ शरीराच्या इतर वाढीइतक्याच वेगाने साधारण १० व्या वर्षांपर्यंत होते. त्यानंतर पुढील ३-४ वर्षांत ती जास्त झपाट्याने होऊन नहाण येण्याचे सुमाराला बऱ्याच अशी पूर्णत्वास येते. त्यानंतर दर मासिक पाळीला अनुसरून थोड्या थोड्या प्रमाणात त्यांची वाढ १८-२० वर्षांपर्यंत पुरी होत. त्यानंतर खऱ्या स्वरूपात स्तनंची वृद्धी गरोदरपणात व नंतर बालसंगोपनाच्या पहिल्या ७-८ महिन्यांत विशेषतेने होते. दुग्धपनाची मातृत्वाची नैसर्गिक जबाबदारी पार पडून झाल्यावर स्तनांच्या ग्रंथी पुन्हा लहान होतात. अर्थातच त्या बाळंतपणापूर्वीच्या स्थितीला येऊन पोहोचत नाहीत. प्रत्येक बाळतपणाचे वेळी अशाच प्रकारची स्थित्यंतरे पुन्हा होतात. आणि नंतर स्तनांचा आकार काहीसा मोठा पण ओघळलेल्या अवस्थेत येऊन राहातो.या नंतरच्या काळात स्तनांच्या ग्रंथी हळूहळू लहान होऊन आकसू लागतात व शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होत जाते, तसतसा स्तनांचा आकारही नैसर्गिकरित्या कमी होत जातो.

स्तनांची निगा
शरीराचे आरोग्य राखण्यासाठी स्वतःची काळजी घेणे अपरिहार्य असते. स्वच्छता व साजेसी आधारपूर्वक वस्त्रसाधने ब्रेसियर्स वापरणे, हे निसर्गतः सर्व स्त्रिया करीतच असतात. त्या बाबतीत स्तनाच्या आणि स्तनाखालची घामाने भिजणारी घडी स्वच्छ व कोरडी ठेवणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणात व त्यानंतर स्तनाग्रांवर कधी कधी भेगा पडतात त्याला लगेच कोरडे करून त्यावर पावडर अथवा ‘मॅसे’ क्रीमसारखे मलम लावणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास स्तनात मोठ्या प्रमाणात पू (Abscess) भरतो आणि त्यापासून खूप सूज येते. दुखू लागते आणि तापही येते. त्याचप्रमाणे केव्हा केव्हा स्तनाची अग्रे आत ओढली जातात. ती जर वेळीच हळूवारपने बाहेर ओढून त्यांना मलम लावले नाही, तर पुढे मुलाला दूध पाजण्याच्या वेळी अनेक अडचणी निर्माण होतात.

स्तनांचा आकार
स्तन हे जरी स्त्रियांचे स्त्रीत्वदर्शक महत्त्वाचे अवयव असले तरी त्यांच्या लहान मोठेपणावर स्त्रीत्व अवलंबून नसते. परंतु तरीसुद्धा आपली वक्षस्थळे उभार व मोठी असावीत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आणि ते स्वाभाविकच आहे. मूलतः स्तनांचा आकार हा बऱ्याच अंशी अनुवंशिक असतो. अमुक एक गोष्ट केल्याने ते मोठे होतात. ही कल्पना चुकीची आहे. आई वडिलांच्या कुटुंबियांमध्ये जशी ठेवण असेल तशी ठेवण स्वाभाविकपणे मुलीमध्ये उतरते. अर्थातच अनुवांशिकेतून वाट्याला येणाऱ्या स्तनांच्या आकाराला आपल्याला हवे तसे स्वरूप काही अंशी प्रयत्नांनी देता येते.जशी इतर शरीराची प्रकृती व स्थिती तशीच वक्षस्थळांची प्रकृती व स्थिती राहात असते. नित्य नियमित योग्य सकस आहार आणि नियमित व्यायाम. शरीर जसे सुधारते तसेच स्तनांचेही असते. स्तनांमध्ये असलेल्या स्नायूंची व्यायाम केल्यामुळे उरोजांच्या उभारील मदत होते. असे व्यायाम प्रत्येक स्त्रीने केले पाहिजेत.

मुली वयात येण्याच्या सुमारास वाढत्या वक्षःस्थळांची जसजशी जाणीव होऊ लागते तसतशा मुली अंतर्मुख होऊ लागतात चार लोकांत वावरताना त्यांना लाज वाटू लागते आणि आपली वाढणारी छाती लपविण्यासाठी त्या छाती आत घेऊन पाठीला पोक देऊन चालू लागतात. तशी त्यांना सवयच लागते. अशामुळे पाठीला येणारी पोक एकंदर सौंदर्याला मारक ठरतो. अशावेळी आपल्या मुलीला योग्य सल्ला देऊन खांद्याची ठेवण ताट आणि पोक न काढता चालण्याची सवय लावल्यास मुलीच्या सौंदर्यास अधिकच भर पडेल यात संशय नाही.

गरोदरपणा व बाळंतपण या अवस्था स्तनांच्या नैसर्गिक वाढीस आवश्यक असतात. अंगाअर दूध पाजण्याने आकार बिघडतो, असा गैरसमज प्रचलित आहे. पण दूध पाजण्याची नैसर्गिक क्रिया होऊ दिली नाही तर स्तनांचे आरोग्य बिघडते व त्याचे काही रोग, काही प्रमाणात कॅन्सरसुद्धा होण्याकडे प्रवृत्ती होऊ शकते. बाळंतपणात ६-७ महिनेपर्यंत अंगावर पाजण्यात कसलीच हरकत नाही. मात्र या काळात योग्य ती स्वच्छता पाळावयास हवी तीला दूध भरपूर प्रमाणात भरून येत असते. तेव्हा बाळाला पुरून उरेल ते दूध वेळच्या वेळी काढून टाकले पाहिजे. म्हणजे त्यात गाठी गवैरे होऊ शकणार नाहीत.६-७ महिने अंगावर पाजल्यानंतर मात्र पुढे जास्त दिवस दूध पाजत राहाणे हितावह नाही. कुटुंबनियोजनाचा मार्ग म्हणून तसे दूध पाजावे अशी जी कल्पना आहे, ती ६-७ महिन्याच्या काळानंतर विश्वसनीय नाही.

स्तनांच्या सौंदर्यासाठी अयोग्य उपाय
कुटुंबानियोजनासाठी स्त्रियांनी गोळ्या घेण्याची प्रथा आहे. ह्या गोळ्यांनी आकार काही प्रमाणात मोठा व उभार होतो. अर्थातच त्यांच्यासाठीच केवळ या गोळ्य़ा घेणे योग्य नाही. गोळ्या बंद केल्यावर काही प्रमाणात स्तनांचा आकार पुन्हा लहान होतो.स्तनंचा आकार मोठा व्हावा यासाठी कधी कधी गोळ्यांचे कोर्सेस, लेप, हॉर्मोन क्रीम यांच्या जाहिराती येत असतात. या जाहिरातींना बळी पडून अनेक स्त्रिया व मुली पैशाची उधळण करीत असतात. केवळ स्तनांची वाढ होण्यासाठी उपयुक्त होतील, अशा कोणत्याही औषध योजतांना शास्त्राधार नाही. जाहिरात केलेल्या औषधांबद्दल पाळली जाणारी धंदेवाईक गुप्तता ही त्या उपाय योजनाबद्दलची सांशकता दाखवायला पुरेशी आहे. त्यामुळे त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या औषधापासून अपाय काय व किती होतील हे सांगणेही कठीण असते, तेव्हा त्या उपाययोजनाच्या मागे न लागणेच जास्त हितावह.

योगोपचार :
स्तनांच्या आरोग्यासाठी, सौंदर्यासाठी अलीकडे योगोपचारावर बरेच लिहिले जात आहे. योगोपचार प्रकृती स्वास्थाला पूरक आहेत हे सर्वश्रुत आहेच. त्यांचा उपयोग शरीराच्या प्रत्येक अवयवाला होतो, तसा वक्षःस्थळांनाही होतो. त्यांचा अवश्य फायदा घ्यावा

शस्त्रक्रियेद्वारे सौंदर्य
शस्त्रक्रियेन अवास्तव मोठे ओथंबलेले स्तन उभार करता येतात. लहान स्तन मोठे दिसावेत म्हणूनही शस्त्र्क्रियाकरता येते. सायलास्टिकचे बनविलेले मऊ गोळे स्तनांच्या मागे शस्त्रक्रियेने बसवून मोठा आकार देण्याच्या पद्धती देखील उपलब्ध आहेत.

स्तनांच्या भयंकर रोग : गाठी
स्तनामधील गाठ म्हणजे प्राणाशी गाठ ! शरीराच्या इतर अवयवांपेक्षा स्तनांचे रोग फार क्वचित होतात. त्या सर्वांमध्ये भयंकर असा कुठला रोग असेल, तर तो म्हणजे स्तनांमध्ये उद्भवणारी गाठ होय. विशेषतः एकाच ठिकाणी वाढत जाणारी व हाताला कठीण लागणारी गाठ, साधारण तिशीच्या पुढे कॅन्सर पासूनची गाठ असण्याचाच जास्त संभव असतो. या गाठी विशेष दुखत नाहीत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सहज २-३ महिन्यांचा काळ लोटून जातो. प्राथमिक अवस्थेत गाठीची शस्त्रक्रिया केल्यास या कॅन्सरपासून पूर्ण बरे होता येते. मात्र उशीर झाला तर सुरुवातीला क्षुल्लक वाटणारी ही गाठ वेगळेच रौद्र स्वरूप धारण करते आणि अखेर शेवटी म्रुत्यूला कारणीभूत ठरते. अर्थात स्तनांमध्ये उद्भवणाऱ्या सर्वच गाठी कॅन्सरच्याच असतात असे नाही. कधी कधी १६ ते २२ वर्षे वयोमर्यदित अशीच एक गाठ स्तनांमध्ये उद्भवते, त्याला फाय्ब्रो अ‍ॅडेनोमा ( Fibro-adenoma) असे म्हणतात. ही गाठ तशी अपायकारक नसते.

त्याचप्रमाणे नंतरच्या काळात साधारपणे अंगावर अजिबात न पाजलेल्य स्त्रियांच्या किंवा अंगावर पाजून बरीच वर्षे झालेली असतील, अशा स्त्रियांच्या स्तनांमध्ये गाठी होऊ लागतात. या गाठी कॅन्सरच्या गाठींएवढ्या कडक नसतात आणि त्या सर्वसाधारणपणे संख्येच्या एकापेक्षा जास्त असतात. हाताला त्या अगदी सहजासहजी जाणवत नाहीत. स्तनाग्रे दाबली तर काही वेळा त्यामधून पिवळट, काळसर किंवा हिरवट द्रव येऊ लागते. अशा प्रकारला फायब्रो-अ‍ॅडेनोसिस ( Fibro-adenoma) असे म्ह्टले जाते. या दुखण्याचा कॅन्सरशी तसा संबंध नाही. पण शंका आल्यास ती गाठ काढून खात्री करणे केव्हाही श्रेयस्करच असते.

स्तनाचे सौंदर्य-निकोपतेचे लक्षण
आपल्या शरीराची जशी सर्वसाधारण काळजी घ्यायची तशीच स्तनांचीही काळजी घेतली जाते यात नवीन काही नाही. भारतीय संस्कृतीच्या परंपरेत स्त्रियांच्या शरीरसौंदर्याची लोभस वर्णने, लिखाणातून, चित्र शिल्पकलेमधून निर्भीडपणे व्यक्त झालेली आहेत. सुखी सहजीवनच हे यशस्वी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. स्त्री पुरुषांनी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. स्त्री पुरुषांनी परस्परांना आकर्षित करावे आणि प्रजोत्पत्तीसाठी एकत्र यावे हा तर निसर्गाचा मूलभूत नियम आहे. स्त्री सौंदर्याचे पुरुषांना आकर्षण वाटणे आणि तसे वाटावे म्हणून स्त्रियांनी प्रयत्न करावा यात वावगे काहीच नाही. आजकाल भारतीय समाज मात्र काहीसा श्र्लील-अश्र्लीलतेच्या विकृत कल्पतांनी गोंधळून गेलेला दिसतो. स्वतःबद्दल बोलणे, शंका निरमन करणे या गोष्टीसुद्धा निष्कारण लाज, संकोच बाळगून वेलेवर केल्या जात नाहीत. अर्थातच त्यामुळे रोग बळावतात. याची प्रत्यंतरे अहोरात्र वैद्यकीय व्यवसायात येत असतात. पाश्चात्त्य देशात स्त्री-पुरुष संबंध हे नैसर्गिक मनले गेले आहेत. अर्थातच कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती योग्य नाहीच, पण जर रूढी अणि कर्मठपणाच्या श्रूंखला समाजाने तोडल्या तर स्वतंत्रतेच्या मोकळ्या वातावरणात भारतातील माणव जास्त सुदृढ आणि सशक्त होईल यात तिळमात्र शंका नाही.

नास्ति भार्या समं मित्रं नास्तिपुत्र समः प्रियः ।
नास्ति भगिनी समा मान्या नास्तिमातृसमो गुरुः ॥
(पत्नीसारखा कोणी मित्र नाही, पुत्रसारखा कोणी प्रिय नाही. बहिणीसारख कोणी आदरणीय नाही, आईसारखा कोणी गुरु नाही. )