Tag Archives: अयोध्या

श्रीरामचंद्राची आरती अयोध्या पुरपट्टण

अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरीं ।
अवतरले श्रीराम कौसल्येउदरीं ॥
स्वानंदें निर्भर होती नरनारी ।
आरति घेउनि येती दशरथमंदीरीं ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीरामा ।
आरती ओंवाळू तुज पूर्णकामा ॥ ध्रु० ॥
पुष्पवृष्टी सुरवर गगनींहुनि करिती ।
दानव दुष्ट भयभीत झाले या क्षीतीं ॥
अपसरा गंधर्व गायनें करिती ।
त्रिभुवनीं आल्हादें मंगलें गाती ॥ जय० ॥ २ ॥
कर्णी कुंडल माथां मुकुट सुविराजे ।
नासिक सरळ भाळी कस्तुरी साजे ॥
विशाळ सुकपोलीं नेत्रद्वय जलजें ।
षट्पदरुणझुणशब्दें नभमंडळ गाजे ॥ जय० ॥ ३ ॥
रामचंद्रा पाहतां वेधलि पैं वृत्ती ।
नयनोन्मीलन ढाळूं विसरलीं पातीं ॥
सुरवर किन्नर जयजयकारें गर्जती ।
कृष्णदासा अंतरीं श्रीराममूर्ती ॥ जय० ॥ ४ ॥