Tag Archives: अवधूत

दत्तात्रेयाची अवधूताची आरती जय देव अवधूता

दत्तात्रेयाची अवधूताची आरती जय देव अवधूता

दत्तात्रेयाची अवधूताची आरती जय देव अवधूता

जय देव जय देव जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी त्रिभुवनिं तुझि सत्ता ॥ ध्रु० ॥
तूझें दर्शन होतां जाती हीं पापें ।
स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥
चरणीं मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें ।
वैकुंठीचें सुख नाहीं यापरतें ॥ जय० ॥ १ ॥
सुगंधकेशर भाळीं वर टोपीटीळा ।
कर्णी कुंडलें शोभति वक्षःस्थळिं माळा ॥
शरणागत तुज होतां भय पडलें काळा ।
तूझे दास करिती सेवासोहळा ॥ जय० ॥ २ ॥
मानवरूपी काया दिससी आम्हांस ।
अक्कलकोटी केला यतिवेषें वास ॥
पूर्णब्रह्म तोची अवतरला खास ।
अज्ञानी जीवांसी विपरीत हा भास ॥ जय० ॥ ३ ॥
निर्गुण निर्विकार विश्वव्यापक ।
स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥
अनंत रूपें धरिसी करणें मायीक ।
तूझें गुण वर्णितां थकले विधिलेख ॥ जय० ॥ ४ ॥
घडतां अनंतजन्मसुकृत हें गांठीं ।
त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी ॥
सुवर्णताटीं भरली अमृतरसवाटी ।
शरणागत दासावरि करीं कृपादृष्टी ॥ जय० ॥ ५ ॥