Tag Archives: अस्तित्व

कल्पना एक आविष्कार अनेक २०१२

कल्पना एक आविष्कार अनेक २०१२
विषय: “आम्हास आम्ही पुन्हा पहावे.”

कल्पना एक आविष्कार अनेक २०१२

कल्पना एक आविष्कार अनेक २०१२

एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाची समजली जाणाऱ्या आणि ‘अस्तित्व’ तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ह्या अभिनव स्पर्धेला यंदा नवा आयाम मिळाला आहे. मराठी नाट्यसृष्टीची ‘पंढरी’ म्हणून ओळखले जाणारे दादरचे ‘शिवाजी मंदिर’ यंदा ही स्पर्धा संयुक्तरीत्या आयोजित करत आहेत.यंदा ह्या स्पर्धेचे सव्विसावे (२६) वर्ष असून ह्या निमित्ताने ही स्पर्धा यंदा तीन विभागात विस्तारित करण्यात आली आहे. मुंबईत श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) तर ‘अभिनय-कल्याण’ उर्वरित महाराष्ट्रात आणि ‘रुद्रेश्वर कलामंच’ गोव्यात ही स्पर्धा सहआयोजित करत आहे. एकूण तीन विभागात होणाऱ्या ह्या स्पर्धेची महाअंतिम फेरी मुंबईत रंगणार आहे. खुल्या गटासाठी होणारया या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात.

यंदाच्या “कल्पना एक”चे कल्पनासूचक आहेत. सध्याचे आघाडीचे नाटककार अभिराम भडकमकर,त्यांनी ह्या स्पर्धेसाठी विषय म्हणून सुचवली आहे: बा.सी.मर्ढेकर यांच्या कवितेतली एक ओळ “आम्हास आम्ही पुन्हा पहावे”आहे. या विषयाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येईल असा त्यांना विश्वास आहे. या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी एकांकिका या स्पर्धेत स्पर्धकांना सादर करायची आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती:
मुंबई विभाग (गोवा / उर्वरित महाराष्ट्र वगळून )
प्राथमिक फेरी : रविवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०१२
प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख – शनिवार ०६ ऑक्टोबर २०१२
संपर्क:
रवि मिश्रा ९८२१०४४८६२
अस्तित्व ९८२१५५३९४२

उर्वरित महाराष्ट्र विभाग (मुंबई / गोवा वगळून )
प्राथमिक फेरी:
रविवार दिनांक ३० सप्टेंबर २०१२
प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख: शनिवार २२ सप्टेंबर २०१२
संपर्क:
अभिजित झुंजारराव ०९९६७०११५९०
विराज जयवंत ०९५९४३६०६८४
प्रवीण शिवणकर ०९९३०९८१३२८
रितेश घाडीगावकर ०७७३८०१४५५२

गोवा विभाग (मुंबई / उर्वरित महाराष्ट्र वगळून)
प्राथमिक फेरी: ०२ ऑक्टोबर २०१२
प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख: सोमवार १० सप्टेंबर २०१२
संपर्क:
योगिश जोशी ०९४२२०६१६५०
निलेश नाईक ०८८०६७२९५९०
पुंडलिक सावंत ०९८२३५३०५३३

स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार १३ ऑक्टोबरला शिवाजी मंदिर इथे संपन्न होईल. स्पर्धेचे प्रवेश अर्ज अस्तित्वच्या www.astitva.co.in या संकेतस्थळावरुन ०१ सप्टेंबर पासून डाऊनलोड करता येतील.