Tag Archives: अहिराणी

बहिणाबाई चौधरी

बहिणाबाई चौधरी

बहिणाबाई चौधरी

जन्म : २४ ऑगस्ट १८८०

मृत्यू : ३ डिसेंबर १९५१

बहिणाबाईंचा

जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदा गावी झाला. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्याकडे जीवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेनुसार बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रसिद्ध झाली. ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या फक्त उपकविता आहेत आणि वऱ्हाडी-खानदेशी या त्यांच्या मातृबोलीत त्या रचिलेल्या आहेत.

लिहीता न येणार्‍या बहिणाबाई ‘अहिराणी’ बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.