Tag Archives: आंबट गोड

कोकोच्या आंबट-गोड वड्या

साहित्य :

  • चार वाट्या दही
  • ३ वाट्या साखर
  • २ मोठे चमचे कोको
  • १॥ चमचा मीठ
  • १ चमचा काजू काप
  • ४ वेलदोडे पूड किंवा १ चमचा व्हॅनिला इसेन्स
  • अर्धी वाटी पीठी साखर

कृती :

दही फडक्यावर ओतून चारपाच तास टांगून ठेवावे. त्यातले पाणी निथळून गेले की, चक्का एका कल्हईच्या मोठ्या पातेल्यात काढून घ्यावा. त्यात साखर, मीठ, कोको, व खोबरे घालून एकत्र करावे व चुलीवर मिश्रण सतत घोटावे. घट्ट होऊन गोळा होऊ लागला की पिठीसाखर घालून खाली उतरावे व घोटावे. त्यात वेलचीपूड किंवा इसेन्स घालून तूपाचा हात फिरवलेल्या ट्रे अगर ताटात मिश्रण थापावे. काजूचे काप वरून शिवरावे. वाटी तळाला तूप लावावे व मिश्रणाचा पृष्ठ भाग सारखा करावा. गार झाल्यानंतर वड्या कापाव्या.