Tag Archives: आंबा रस

आंब्याच्या रसातील भात

साहित्य :

  • २ वाट्या बासमती तांदूळ
  • २ आंब्यांचा रस
  • ७-८ लवंगा
  • थोडे साजूक तूप
  • १॥ वाटी साखर

कृती :

प्रथम पाणी कमी घालून मोकळा भात करावा. नंतर एका पातेल्यात थोड्याशा तुपात लवंगा घालून त्यावर भात घालावा. भातावर साखर घालून थोडेसे परतून घ्यावे. साखर विरघळली की त्यात आंब्याचा रस घालून मंद आचेवर ठेवावे. त्यात थोडेसे तूप घालून चांगले ढवळावे म्हणजे रस सगळीकडे लागेल. साधारण १० मिनिटात हा भात तयार होतो.