Tag Archives: आंबा रायते

आंबा रायते

साहित्य :

  • अर्धा डझन साधे आंबे
  • ओल्या नारळाचे दाटसर दूध एक वाटी
  • चिमुटभर जिरेपूड
  • मीठ
  • थोडी साखर

कृती :

आंबे स्वच्छ धुऊन काचेच्या पसरट भांड्यात त्याचा रस काढा. नारळाच्या दुधात साखर, मीठ टाकून ढवळून घ्या. हे दूध काचेच्या भांड्यातील रसावर घाला. त्यावर जिरेपूड टाका. भांडे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर खा.