Tag Archives: आक्रोड

मिरची, लसूण, दालचिनी आता चॉकलेट मध्येही

सैंधव मीठयुक्त चॉकलेट्स

सैंधव मीठयुक्त चॉकलेट्स

मिरचीयुक्त चॉकलेट्स

मिरचीयुक्त चॉकलेट्स

दिवाळ सण १५ दिवसांवर आला आहे. सगळीकडेच उत्साहाचं आणि चैत्यन्याचं वातावरण आहे. घरोघरी फराळ, फटाके, खरेदी, भेटवस्तू यांचे बेत आखले जात आहे. भारतात दिवाळसण मोठा असल्याने मिठाई, फराळ आणि भेटवस्तूचीं देवघेव मोठ्या प्रमाणावर होते. सणासुदीच्या काळात माव्यातही मोठ्या प्रमाणावर भेसळ होतेच यामूळे तोंड गोड करण्यासाठी किंवा भेट म्हणून देण्यासाठी चॉकलेट्स हा मस्त पर्याय आहे. त्यातुनही जरा हटके फ्लेवर्स सणांची लज्जत आणखी वाढवतील.

मिरची, लसूण, दालचिनी हे फ्लेवर्स जर तुम्हाला चॉकलेट्स मध्ये मिळाले तर, काय चमकलात ना. ही, जरा हटके फ्लेवर्स बाजारात आणली आहेत डिवीनिटी चॉकलेट्स या बॅण्ड ने. याशिवाय अरोमा, कोकोनटी, कुकीज अ‍ॅण्ड क्रीम डोनाटेल्ल, मिंट चिझर्स, व्हॅनीला अल्मोन्ड ऑरेंन्ज टांगो, रेसीन क्रिम, माकाचीनो हेही फ्लेवर्स उपलब्ध आहे. चॉकलेट्स मध्ये नविन प्रयोग करुन डिवीनिटी चॉकलेट्स नी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

दालचिनीयुक्त चॉकलेट्स

दालचिनीयुक्त चॉकलेट्स

श्रमिक नागरी संघ या संस्थेअतंर्गत डिवीनिटी चॉकलेट्स चे उत्पादन केले जाते. श्रमिक नागरी संघ ही एक महिलांच्या सबलीकरणाचे कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. डेवीनिटी चॉकलेट्सच्या उत्पादनात गरजू आणि गरीब महिलांचा सहभागी आहे. या महिलांच्या होतकरू कामगिरीचा परिणाम उत्पादनाचा दर्जा टिकवण्यात झाला आहे. पॅकेजिंग, वितरण आणि विक्री यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक कॉरपोरेट कंपन्यांची सोशल रिस्पॉंसिबिलिटी अजेंड्या अंतर्गत भेट्वस्तू म्हणून डिवीनिटी चॉकलेट्स ला पहिली पंसती आहे. या चॉकलेट्स ची काही ठळक वैशिष्ट्य म्हणजे चॉकलेट्स च्या थाळी, ऑर्गनझा पाऊच तसेच आक्रोड आणि फळांसारखे चॉकलेटस चे डबे आणि आकर्षक पॅकिंग. ही चॉकलेट्स १०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. आता चॉकलेट्स ही केवळ बच्चे कंपनीची मक्तेदारी राहिलेली नाही तेव्हा वेगळी चव आणि आकर्षक पॅकेजिंग यामूळे या दिवाळ सणाला डिवीनिटी चॉकलेट्स ही आगळी वेगळी भेट ठरू शकते.