Tag Archives: आग

मुंबई मंत्रालय पेटले

मुंबई मंत्रालय पेटले

मुंबई मंत्रालय पेटले

ज्या इमारतीतून महाराष्ट्राचा राज्यशकट हाकला जातो, त्याच मंत्रालयात आज दुपारी भीषण आग लागली आणि सगळीकडे हाहाकार उडाला. शॉर्ट सर्कीटच्या आगीची ठिणगी चौथ्या मजल्यावर नगरविकास सचिवांच्या ऑफिसमध्ये पडली आणि बघता-बघता या आगीने पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरही थैमान घातले. या भयंकर आगीमुळे संपूर्ण मंत्रालयात धुराचे साम्राज्य पसरले आहे.

नगरविकास खात्यासह अनेक महत्त्वाच्या खात्यांमधील कागदपत्रे या आगीत जळून खाक झाली आहेत. सहाव्या मजल्यावर काही कर्मचारी अडकले आहेत पण सुदैवाने कुणाच्याही जीवाला धोका पोहोचलेला नाही. आपले सर्व प्रयत्न पणाला लावून अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थ करीत आहेत. मदत आणि बचावकार्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री जातीने लक्ष घालीत आहेत.