Tag Archives: आबाजी सोनदेव

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्ह्याचा नकाशा

ठाणे जिल्ह्याचा नकाशा

आबाजी सोनदेव यांनी केलेली कल्याणच्या खजिन्याची लूट, थोरल्या बाजीराव पेशव्याचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसईच्या किल्ल्यास दिलेला वेढा, साष्टीचा कब्जा व ठाण्याच्या किल्ल्यातून त्रिंबकजी डेंगळे यांचे पलायन यांसारख्या मराठेशाहीतील अनेक स्फूर्तीदायक प्रसंगाचा हा जिल्हा साक्षी आहे; तर जिल्ह्यात असलेले ठाणे, वसई, अर्नाळामाहुली हे ऐतिहासिक किल्ले या जिल्ह्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण गणल्या गेलेल्या या जिल्ह्यात राज्यातील सर्व प्रकारची भौगोलिक व सामाजिक विविधता एकत्र आली आहे.

राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ६.६४ टक्के इतकी लोकसंख्या या जिल्ह्यात राहाते. लोकसंख्येचा विचार करता राज्यात मुंबई उपनगर व पुणे य जिल्ह्यानंतर ठाणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटरला ५४९ इतकी असून ती राज्यातील लोकसंख्येच्या घनतेच्या दुपटीहून अधिक आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता मुंबईमुंबई उपनगर या जिल्ह्यांनंतर ठाणे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो.