Tag Archives: आबा बागुल

पुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ चे शानदार उद्घाटन

पुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ चे शानदार उद्घाटन

पुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ चे शानदार उद्घाटन

१८ व्या पुणे नवरात्रौ (नवरात्र) महोत्सवाचे उद्घाटन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आले.

याप्रंसगी कला आणि राजकारण क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन आणि सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल कार्यक्रमाचे आकर्षण होते. याप्रंसगी रत्नाकार शेळेके अ‍ॅकडमीच्या कलाकारांनी सादर केलेली गणेश वंदना, प्राजक्ता माळी हिने सादर केलेले लक्ष्मी स्तवन तसेच केशवराव बडगे यांच्या शिष्याने सादर केलेल्या कलाआविष्कारांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात प्रसिध्द संगीतकार अजय-अतुल, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ नॄत्यांगणा लीना गांधी, लावणी कलाकार रेष्मा मुसळे, अभिनेते चेतन दळवी यांना ‘महालक्ष्मी कला संस्कृती ’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या महोत्सवातील हेलन ची उपस्थिती आकर्षणांचा केंद्रबिंदू ठरली. “मला माईक समोर बोलण्याची सवय नाही, यापुर्वी माझे पाय बोलायचे पण आता पाय थकल्याने तोंडने बोलावे लागत आहे. पुणेकरांनी आपल्यावर केलेल्या कौतुकाच्या वर्षावाने आपण भारावून गेलो आहोत” या मोजक्याच शब्दांत हेलनने आपलं मनोगत मांडून उपस्थितांची मनं जिंकली.

तसेच कार्यक्रमा दरम्यान संगीतकार अजय अतुल यांनी त्यांना मिळालेली पुरस्काराची रक्क्म वादक पाडूरंग घोटकर यांना देऊन पडद्यामागच्या कलाकारांना सलाम केला. दरम्यान पुणे नवरात्रौ महोत्सवाने पुण्याच्या सांस्कॄतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवल्याचं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले. संयोजक आबा बागूल यांच्या वतीने आयोजित पुणे नवरात्रौ महोत्सव हा दहा दिवस चालणार असून यात विविध कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ फोटो