Tag Archives: आलं

आलं, लिंबाचं सरबत

साहित्य :

  • ५० लिंबे (रस)
  • २५० ग्रॅम आलं (रस)
  • २ किलो साखर
  • मीठ चवीप्रमाणे
  • १ चमचा सोडिअम बेन्झॉइट

कृती :

लिंबाचा रस व आल्याचा रस काढावा. रस असेल तेवढेच पाणी घेणे. ते पाणी २ किलो साखरेत मिसळून १ उकळी येईपर्यंत ढवळत राहावे. पाक थंड झाल्यावर त्यात दोन्ही रस व सोडियम बेन्झॉइट मिसळावे.सरबत देताना पाव भाग तयार झालेले सिरप, पाऊण भाग पाणी व चवीनुसार मीठ आणि बर्फाचा खडा घालावा.