Tag Archives: आवळ्याची पावडर

चणा मसाला

साहित्य:

  • ५०० ग्रॅम पांढरे चणे
  • १५० ग्रॅम टोमॅटो
  • २०० ग्रॅम कांदा
  • ४-५ कळी लसूण
  • १ तुकडा आले
  • २ हिरवी मिरची
  • १/२ लहान चमचा लाल तिखट
  • १ लहान चमचा धणे पावडर
  • २ लहान चमचे चना मसाला पावडर
  • मीठ चवीप्रमाणे
  • ३ चमचे तेल
  • १ लहान चमचा आवळ्याची पावडर
  • १/२ लहान चमचा खाण्याचा सोडा

कृती:

चणा मसाला

चणा मसाला

चणे ८ ते १० तास पाण्यात भिजवा. कुकरमध्ये १/२ चमचा खाण्याचा सोडा टाकून उकडून घ्या.

कांदा व टोमॅटो मिक्समधून काढा. आले, लसूण व हिरवी मिरची मिक्सरमधून काढा.

एका कढईत तेल गरम करून कांदा-टॉमेटोची पेस्ट परता. २ मिनीटांनी आल्याची पेस्ट टाका. व्यवस्थित परता व त्याच्यात लाल तिखट, धणे पावडर व मसाला टाकून परता.

आता उकडलेले चणे, मीठ व आवळ्याचे पावडर टाका व एकत्र करा व २ मिनीटे शिजवून गॅस बंद करा.