Tag Archives: इंग्लड

मात्रा अशी लागू पडाली

इंग्लडमध्ये त्या वेळी चोर व दरोडेखोर यांनी अगदी उच्छाद मांडला होता. रस्त्याने जाण्यार्‍या स्त्रियांच्या अंगावरचे अलंकारही चोर हिसकावून, पळवून नेत. पोलिस बंदोबस्त वाढवला गेला होता पण अंगावर अलंकार घालून रस्त्याने जाणार्‍या प्रत्येक बाईला पोलिस संरक्षण देणे शक्य नव्हते. म्हणून त्या वेळच्या चार्ल्स राजाने फ़र्मानं काढले, रस्त्याने जाणार्‍या कुणाही बाईने अलंकार घालू नये.

पण श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची सोस असलेल्या बर्‍याच बायका राजाज्ञा न जुमानता, अंगावर दागिने घालून रस्त्याने जाऊ जागल्या व चोर आणि दरोदेखोर यांचे लक्ष बनू लागल्या.

अखेर चार्लस राजाने दुसरे सुधारित फ़र्मान काढले ते पुढीलप्रमाणे; “रस्त्याने जाताना कुणाही स्त्रीने अंगावर अलंकार घालू नयेत. अर्थात वेश्या, कलावंतिणी व वाईट चालीच्या बायांना हा नियम न पाळण्याची मुभा देण्यात येत आहे”. राजा चार्ल्सच्या या सुधारित फ़र्मानाचा अतिशय चांगला परिणाम झाला.

आपण अलंकार घालून रस्त्याने जाऊ लागलो, तर आपली गणना वाईट स्त्रियात होईल, अशा भीतीने चांगल्या स्त्रियांनी तर अलंकार घालून रस्त्याने जाताना दागिने घालायचे बंद केलेच, पण वेश्या व कलावंतीणी यांनीही आपल्या हीन व्यवसायाची सर्वत्र जाहिरात होऊ नये, म्हणून रस्त्याने जाताना दागिने घालायचे सोडून दिले. पोलिसांवर पडणारा कामाचा ताण बराच कमी झाला.