Tag Archives: इमृती

इमृती

साहित्य :

  • १ कप उडदाची डाळ
  • ३ कप साखर
  • २ कप पानीर
  • थोडा पिवळा रंग.

कृती :

उडदाची डाळ ४ तास भिजत घालावी. नंतर थोडे पाणी घालून मिक्सरवर अगदी गुळगुळीत वाटावी.साखर व पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. पाकात रंग घालावा व पाक गरम असावा. उडदाची वाटलेली डाळ खूप फेसून घ्यावी. जिलेबी करावयाच्या प्लॅस्टिकच्या बाटलीत पीठ भरावे. नंतर परातीत किंवा उथळ फ्राईंग पॅनमध्ये तूप तापात ठेवावे. प्रथम एक गोल रिंग पाडावी. नंतर त्या रिंगवर कडेने गोल तोड्याप्रमाणे जिलेबी पाडावी. थोड्याशा सवयीने चांगली पाडता येईल. अशा ४-५ इमृती घालाव्या. गॅस मध्यम असावा. विणायच्या सुईने इमृती खालून जरा उचलल्यासारखी करावी. नंतर छोट्या धुतलेल्या कात्रीने इमृती सुट्या करून उलटाव्या. नंतर सीनेच उचलाव्या व पाकात टाकाव्या.
दुसरा घाणा झाला की पहिल्या इमृती पाकातुन काढाव्या. उडदाची डाळ वाटल्यावर जास्त वेळ ठेवू नये, लगेचच इमृती कराव्या.