Tag Archives: इलिआना डिक्रुझ

१९ ऑगस्ट दिनविशेष

मादाम कामा

मादाम कामा

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १६६६ : दुसरे अँग्लो-डच युद्ध-होम्सची होळी – रियर अॅडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलँड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.
  • १६९२ : सेलम विच ट्रायल्स – चेटूकविद्येचा वापर करीत असल्याच्या आरोपावरून सेलम, मॅसेच्युसेट्स येथे एक स्त्री एक धर्मगुरू सहित पाच व्यक्तींना मृत्युदंड.
  • १८३९ : जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले.
  • १९१९ : अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९३४ : जर्मन जनतेने ८९.९% मतांनी फ्युह्रर हे पद निर्माण करण्याचे ठरवले.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याच्या साथीने पॅरिसमधील जनता जर्मनीविरुद्ध उलटली.
  • १९४५ : हो चि मिन्ह व्हियेतनाममध्ये सत्तेवर.
  • १९५३ : सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.
  • १९५५ : हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.
  • १९७६ : नागार्जुनसागर विद्यापिठाची स्थापना.
  • १९८० : सौदी अरेबियातील रियाध शहराच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाइट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.
  • १९८१ : अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी सिद्राच्या अखातात लिब्याची दोन सुखॉई एस.यु. २२ प्रकारची विमाने पाडली.
  • १९८७ – युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला.
  • १९९१ : सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
  • २००२ : ग्रॉझ्नीजवळ चेच्न्याच्या सैन्याने रशियाचे एम.आय. २६ प्रकारचे हेलिकॉप्टर पाडले. ११८ सैनिक ठार.
  • २००३ : इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.
  • २००३ : जेरुसलेममध्ये हमासने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ७ मुलांसह २३ ठार.

जन्म

  • १८७१ : ऑरविल राइट, विमानसंशोधक.
  • १८७८ : मनुएल क्वेझोन, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८८३ : होजे मेंडेस काबेसादास, पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष आणि पोर्तुगालचा पंतप्रधान.
  • १९०३ : गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.
  • १९२१ : जीन रॉडेनबेरी, स्टार ट्रेक कथानाकाचे निर्माते.
  • १९२२ : बबनराव नावडीकर, मराठी गायक.
  • १९४६ : बिल क्लिंटन (विल्यम जेफरसन क्लिंटन), अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९८७ : इलिआना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मॄत्यु

  • १४ : ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.
  • १४९३ : फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १६६२ : ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी.
  • १८१९ : जेम्स वॅट, वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे.
  • १९३६ : मादाम कामा, आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा तिरंगा झेंडा प्रथमच फडकविणार्‍या.
  • १९४७ : ऍल्सिदे दि गॅस्पेरी, इटलीचा पंतप्रधान.
  • १९५४ : ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.
  • १९७६ : केन वॉड्सवर्थ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ : ग्राउचो मार्क्स, अमेरिकन अभिनेता.