Tag Archives: उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

उद्या दहावीचा ऑनलाईन निकाल

दहावीचा ऑनलाईन निकाल

दहावीचा ऑनलाईन निकाल

येत्या बुधवारी (१३ जून) रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल मंडळाच्या वेबसाईटवर व एकूण सहा वेबसाईटवर आणि मोबाईलवर एसएमएस द्वारे पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्कलिस्ट २२ जूनला मिळणार आहे.

ही माहिती मंडळाचे सचिव शहाजी ढेकणे यांनी पत्रकाद्वारे दिली. वेबसाईटवरून या निकालाच्या मार्कलिस्टची प्रिंट आउट घेण्याची सोय केली आहे. विद्यार्थ्यांना या प्रिंट आउटच्या आधारे अकरावी तसेच डिप्लोमा, आयटीआयमधील अभ्यासक्रमांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मात्र, अंतिम प्रवेश अधिकृत मार्कलिस्टच्या अधारेच होणार आहे.

२२ जून रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर शाळांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना अधिकृत मार्कलिस्टची वाटप करुन देण्यात येणार आहे. अधिकृत मार्कलिस्ट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन जुलैपर्यंत गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. ऑक्टोबरमधील परिक्षेसाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन जुलैपर्यंत, तसेच सहा जुलैपर्यंत विलंब शुल्कासाठी अर्ज करता येणार आहे. जे विद्यार्थी सर्व विषयांत उत्तीर्ण झालेले आहेत पण ज्यांना श्रेणीसुधारणी करायची आहे त्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी ज्या विद्यार्थ्यांना हवी आहे, अशांनी विहीत नमुन्यात अर्ज केल्यानंतर प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये शुल्क भरून ही प्रत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २८ जून पर्यंत यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

या वेबसाईटवरुन निकाल पहा

निकाल एसएमएस द्वारे पाहण्यासाठी

 • बीएसएनएल
  MSSC (seat number) 57766
 • एअरटेल
  MSSC (seat number) 55077
 • इनोव्हा
  MSSC (seat number) 8800654242
 • Rediff.com India Limited
  MSSC (seat number) 573335000