Tag Archives: उडीद डाळ

कांचीपुरम इडली

कांचीपुरम इडली

कांचीपुरम इडली

साहित्य :

  • दोन वाट्या  उकडा तांदूळ
  • १ वाटी उडीद डाळ
  • अर्धी वाटी चणा डाळ
  • पाव चमचा हिंग
  • १ चमचा काळे मिरे
  • १ टी. स्पून जिरे
  • थोडे आले किसून
  • थोडा कढीलिंब
  • थोडे काजूचे तुकडे
  • चवीनुसार मीठ

कृती :

तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे. जिरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला. थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला. आले किसून टाकून पीठ खूप फेटावे. पीठ फेटून स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात, चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.