Tag Archives: उडीद

माँ दी दाल

साहित्य:

  • १ कप उडीद डाळ
  • १/२ कप राजमा
  • ४ कप पाणी
  • १ तुकडा कापलेले आले
  • ४ पाकळी कापलेला लसुण
  • १ कापलेला कांदा
  • ३/४ चमच गरम मसाला
  • २ कापलेली हिरवी मिरची
  • १/२ चमचे हळद
  • १ चमचा मीठ
  • २ मोठे चमचे तेल
  • ३/४ चमचे जीरे
  • १ जुडी कापलेली कोथिंबीर
  • २ मोठी कापलेली टोमॅटो
  • ३/४ चमचे लाल मिरची

कृती:

माँ दी दाल

माँ दी दाल

उडीद व राजम्यास ४ कप पाणी व एक चुटकी मीठ टाकुन उकळावे. तेल गरम करून जीरे टाकावे.

नंतर कांदा, लसूण, आले व हिरवी मिरची फ्राय करावी. मीठ, वाटलेली लाल मिरची व हळद टाकून एक मिनीट फ्राय करावे, नंतर टोमॅटो टाकावे.

३ मिनीटानंतर उकळलेली डाळ टाकावी आणि चमच्याने चांगली घोटावी, ४-५ मिनीट उकळल्यानंतर कोथिंबीर व गरम मसाला टाकावा आणि तंदूरी पोळी बरोबर गरम गरम खावी.